मुलीला जन्‍म दिल्‍यानंतर या लोको ड्रायव्‍हरचा झाला होता मृत्‍यू, अशी आहे हिच्‍या स्‍वप्‍नांची कहाणी

मुलीला जन्‍म दिल्‍यानंतर या लोको ड्रायव्‍हरचा झाला होता मृत्‍यू, अशी आहे हिच्‍या स्‍वप्‍नांची कहाणी

शहरातील शासकीय रुग्‍णालयात एका गोंडस मुलीला जन्‍म दिल्‍यानंतर हरियाणाची महिला असिस्‍टंट लोको पायलटचा डिलिव्‍हरीदरम्‍यान मृत्‍यू झाला. 5 वर्षांपूर्वी 3 विभागात टॉप क्रमांक मिळवून लोको पायलेट बनलेली ही महिला 4 दिवसांपासून रुग्‍णालयात दाखल होती. तिच्‍या पतीने व नातेवाईकांनी रुग्‍णालयावर निष्‍काळजीपणाचा आरोप लावला आहे. मात्र रुग्‍णालयाने या आरोपांचा इन्‍कार केला आहे.

 

डिलिव्‍हरीच्‍या 3 तासानंतर झाला मृत्‍यू
– रजनी या 2012मध्‍ये भारतीय रेल्‍वेमध्‍ये असिस्‍टंट लोको पायलेट म्‍हणून भरती झाल्‍या होत्‍या. 32 वर्षीय अंबाला पूर्वीही एक मुलगी होती. दुस-या प्रेग्‍नंसीदरम्‍यान 28 डिसेंबररोजी त्‍यांना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले होते.
– सोमवारी रात्री 1 वाजता रजनी यांनी एका मुलीला जन्‍म दिला. त्‍यानंतर 3 तासांमध्‍ये त्‍यांचा मृत्‍यू झाला.
– रजनी यांचे पती शक्‍ती सिंह यांनी सांगितले आहे की, 29 डिसेंबररोजी सकाळी साडे दहा वाजता ते पत्‍नीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते. त्‍यांना भरती करण्‍यात आले. त्‍यांची डिलिव्‍हरीही झाली. मात्र अचानक त्‍यांचा मृत्‍यू झाला. डॉक्‍टरांनी उपाचारामध्‍ये निष्‍काळजीपणा केल्‍यामुळे त्‍यांचा मृत्‍यू झाला, असा आरोप रजनी यांच्‍या पतीने केला आहे.
लहानपणी रेल्‍वेचे इंजिन पाहताच रोमांचित व्‍हायच्‍या रजनी
– 2012मध्‍ये रेल्‍वे लोको परिक्षेच्‍या मुलाखतीमध्‍ये त्‍यांनी सांगितले होते की, त्‍यांचे वडील देखील रेल्‍वे ड्रायव्‍हर होते. लहानपणी रेल्‍वे इंजिन पाहताच मी रोमांचित व्‍हायचे. वडीलांना लोको पायलेट बनण्‍याची इच्‍छा असल्‍याचे सांगितल्‍यानंतर त्‍यांनीही मला विरोध केला नाही.

– त्‍यांनी नंतर शहरातील कल्‍पना चावला पॉलिटेक्निक कॉलेजमध्‍ये डिप्‍लोमा केला. लोको पायलेटची परीक्षाही पास झाल्‍या. ट्रेनिंगमध्‍ये 3 विभागात त्‍या टॉप आल्‍या होत्‍या. चंदीगड ते अंबाला ही ट्रेन त्‍यांनी प्रथम चालवली होती.
हार्ट अटॅकमुळे रजनी यांचा मृत्‍यू, डॉक्‍टरांचा दावा

– शहरातील शासकीय रुग्‍णालयात एका गोंडस मुलीला जन्‍म दिल्‍यानंतर हरियाणाची महिला असिस्‍टंट लोको पायलटचा डिलिव्‍हरीदरम्‍यान मृत्‍यू झाला. 5 वर्षांपूर्वी 3 विभागात टॉप क्रमांक मिळवून लोको पायलेट बनलेली ही महिला 4 दिवसांपासून रुग्‍णालयात दाखल होती. तिच्‍या पतीने व नातेवाईकांनी रुग्‍णालयावर निष्‍काळजीपणाचा आरोप लावला आहे. मात्र रुग्‍णालयाने या आरोपांचा इन्‍कार केला आहे.

– दुसरीकडे अंबाला सिटी हॉस्पिटलचे आरएमओ यांनी आपल्‍यावरील आरोपांचा इन्‍कार करताना म्‍हटले आहे की, ‘रजनी प्रथम आल्‍या तेव्‍हा डिलिव्‍हरीसाठी वेळ असल्‍याने आम्‍ही त्‍यांना दाखल करुन घेण्‍यास नकार दिला होता. मात्र त्‍यांनी हट्ट केल्‍यामुळे त्‍यांना अॅडमिट केले. नंतर सोमवारी रात्री त्‍यांची नॉर्मल डिलिव्‍हरी झाली. माता व मुलगी दोघेही स्‍वस्‍थ होते. मात्र अचानक त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍याने आमच्‍यावर आरोप करण्‍यात येत आहे. मात्र हे चुकीचे असून हार्ट अटॅकमुळे त्‍यांचा मृत्‍यू झाला आहे.