५ जानेवारी २०१८: अशुभ योग समाप्त : जॉब आणि बिझनेसमध्ये लकी राहतील या राशीचे लोक

अशुभ योग समाप्त : जॉब आणि बिझनेसमध्ये लकी राहतील या राशीचे लोक.

शुक्रवारी चंद्र सिंह राशीमध्ये आल्यामुळे ग्रहण योग समाप्त होत आहे. यासोबतच सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना जॉब आणि बिझनेसमध्ये लाभ होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील.

मेष – तुमचा आकर्षक पेहराव इतरांना आकर्षित करेल. उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण राहील. गृहीणी पार्लरसाठी वेळ काढतील. शुभ रंग: तपकिरी, अंक-३.

वृषभ – आज आळसावलेले असाल. ऑफिसला दांडी मारण्याचा मूड असेल. गृहीणींचे कष्ट कारणी लागतील. विद्यार्थी आवडत्या विषयात लक्षणिय कामगिरी करतील. शुभ रंग: आकाशी, अंक-९.

मिथुन – उद्योगधंद्यात आर्थिक स्वास्थ्य अनुभवास येईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. गृहीणींना पाहुणचार करवा लागेल. वादविवादास तत्पर असाल. शुभ रंग : हिरवा, अंक-१.

कर्क – व्यर्थ बडबड न करता आज मिटल्या तोंडी आपला स्वार्थ साधून घ्या. आर्थिक बाजू भक्कम राहणार आहे. आज प्रवासात वादविवाद होतील. संयम ठेवा. शुभ रंग: स्ट्रॉबेरी, अंक-५.

सिंह – प्रयत्नांची शिकस्त कराल तर अाज यशाची खात्री शंभर टक्के आहे. समस्या जाणवल्या तरी फार टेन्शन घेऊ नका. संध्याकाळी जोडीदाराशी एकमत. शुभ रंग : केशरी, अंक-३.

कन्या – व्यावसायिक कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. इतरांना दिलेले शब्द पाळणे कठीण जाईल. व्यवहार व नातेसंबंध यांची गल्लत करु नका. व्यस्त दिवस. शुभ रंग : लाल, अंक-५.

तूळ – यापूर्वीच्या अथक परिश्रमांचे फळ मिळवून देणारा दिवस. मंदावलेली व्यवसायाची गती पूर्वपदावर येईल. जमेचे पारडे आता जड राहील. उत्साही दिवस. शुभ रंग : क्रिम, अंक-२.

वृश्चिक – नोकरीच्या ठीकाणी आपली कार्यनिष्ठा पणास लावाल. वरिष्ठांचा विश्वास संपादन केल्याने आता बढतीच्या मार्गतील विघ्नं दूर होणार आहेत. शुभ रंग : अबोली, अंक-८.

धनू – कार्यक्षेत्रात विरोधक वरचढ होण्याची शक्यता आहे. अल्पपरिचीत व्यक्तींवर विसंबून कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ नका. घरातील वृध्दांचे उपदेश ऐकून तरी घ्याच. शुभ रंग : चंदेरी, अंक-३.

मकर – कार्यप्रांतात नवी आव्हाने उभी राहतील. लक्ष्मी चंचल असल्याचा अनुभव येईल. सहज कुठलीही गोष्ट साध्य होणे श्क्य नाही. साडेसातीची तीव्रता जाणवेल. शुभ रंग : मरुन, अंक-४.

कुंभ – कार्यक्षेत्रात नेतृत्वाची संधी चालून येईल. गृहीणींकडून सांसारीक प्रश्न अगदी सहजपणे सोडवले जातील. गृहीणी पतीराजांनी केलेल्या कौतुकाने सुखावतील. शुभ रंग : पिवळा, अंक-७.

मीन – कष्टांच्या प्रमाणांत मोबदला कमीच राहील. आज कमीच बोला. स्पष्ट बोलण्याने हितचिंतक दुखावले जातील. खाणेपिणे नियंत्रणात ठेवा. पोट बिघडेल. शुभ रंग : निळा, अंक-६.