इटलीच्या या ठिकाणाला म्हणतात स्वर्ग, मात्र खरेदी करणाऱ्याचा होतो मृत्यू

इटलीच्या या ठिकाणाला म्हणतात स्वर्ग, मात्र खरेदी करणाऱ्याचा होतो मृत्यू.

आयलँड हे जगातील सुंदर ठिकाणांपैकी एक मानले जाते. लोक शांतता आणि सौंदर्यासाठी येथे येतात. मात्र जगात असेही काही आयलँड आहेत जे खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होतो.

जाणून घ्या कुठे आहे असे ठिकाण
– मीडिया रिपोर्टनुसार, इटलीचे गैओला आयलँड हे असे एक ठिकाण आहे, ज्याला खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होता. चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या या ठिकाणावर कायम पर्यंटकांची गर्दी असते.
– काही लोक येथे आल्यानंतर या आयलँडच्या प्रेमातच पडले आणि ते खरेदी करण्याचीच त्यांनी तयारी केली. मात्र जेव्हा जेव्हा हा आयलँड आपल्या मालकीचा करण्याचा कोणी प्रयत्न केला त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
1920 मध्ये स्विस ऑपर हॅन्स ब्राऊन यांचा येथे मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नीने समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. ब्राऊन यांचे शरीर एका कार्पेटमध्ये गुंडाळलेले सापडले होते.

याठिकाणच्या दुसऱ्या मालकाने मेंटल हॉस्पिटलमध्ये आत्महत्या केली होती.

आयलँड खरेदी करणाऱ्या फियेट गियेना एंजेली यांच्या एकुलत्या एका मुलाने आत्महत्या केली होती. अशा एकानंतर एक घटना समोर येत गेल्याने हे आयलँड खरेदी करण्यासाठी लोक आता हजारवेळा विचार करत आहेत. लोक येथे सकाळी येतात आणि दिवस मावळण्याआधी येथून काढता पाय घेत आहेत.